विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.44.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
स्वामी समर्थ मानस पूजा
0
1507
210249
157073
2024-11-12T01:04:57Z
59.184.126.177
210249
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष =
| टिपण =[https://blog.dattaprabodhinee.org/search/label/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7 स्वामी समर्थ मानस पूजा लिंक]

<poem>
|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||
|| श्रीगणेशाय नम: ||
नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुतार्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।। महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज ९
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||
|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||
</poem>
| वेब पेज = [https://blog.dattaprabodhinee.org/2016/05/blog-post_18.html संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा]
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्तोत्रे]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
fpn9wicyo603b9gtd7hpz5nktl21kf2
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८५
104
104222
210246
210230
2024-11-11T15:34:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
210246
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>इच्छा होते. भरलेले मेघ आणणारे वारे, ईश्वराच्या करुणेचे जणुं ते अग्रदूत- सृष्टीतील विविधतेमधील मेळ पहा, तींतील एकता पहा. मानवजातींत हि विविधता आहे व सदृशता, एकताहि आहे. फुले, फळे, हे प्राणी, मानव या सर्वांवरून, या चराचर सृष्टीवरून कोणी तरी एक सर्वश्रेष्ठ महान् परमेश्वर आहे असें नाहीं का दिसत?"
{{gap}}असें मुहंमद सांगत, विचारित. चमत्कारांवर भर न देतां ते बुद्धीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसरपणावर जोर देणारे ते नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुद्धीचा महिमा ते जाणत. पैगंबरांनाहि सारी सृष्टि ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असें वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार ! सारी सृष्टि परमेश्वराचा महिमा जणुं मुक्यानें गात आहे.
{{Block center|<poem>जिव्हा प्रत्येक पानांत । ध्वनि प्रत्येक निर्झरीं
सर्वत्र घुमते वाणी । वाऱ्यावर धरेवरी
निरभ्र गगनीं आहे । महान् पूरामधें असे
सर्वत्र ईश्वरी वाणी । नावेक न विसांवते ॥</poem>}}
{{gap}}अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा हा आचार्य सृष्टीचाहि आचार्य आहे. त्या एकेश्वराचा हा पैगंबर सृष्टीचाहि पैगंबर आहे. विश्वांत सर्वव्यापी नियम आहे, व्यवस्था आहे, ऋतसत्य आहे, एक चिच्छक्ति सर्वत्र भासत आहे, एक संकल्पशक्ति, नियामक, विश्वशासक, विश्वमार्गदर्शक अशी आहे, असें पैगंबर सांगत आहेत. आणि सर्वांत मोठा चमत्कार कोणता? मुहंमद सांगतात "निसर्गाची, सदसद्विवेकबुद्धीचीं, भविष्यासंबंधीची जीं दैवी सत्यें संस्फूर्त वाणीनें सागितलीं गेलीं, ज्याचें हें कुराण बनले, त्या कुराणाहून अधिक मोठा चमत्कार कोणता?" मुहंमद विचारतात, "अरे अश्रद्धावंतांनो ! तुमच्या या सामान्य भाषेत जगांतील असे अद्वितीय पुस्तक प्रकट व्हावें, ज्यांतील लहानसा भागहि सोन्यानें मढवून ठेवलेल्या तुमच्या सर्व पद्यांना व गीतांना लाजवील, असें हें कुराण- त्या परमेश्वराच्या विश्वव्यापक करुणेची मंगल वार्ता देणारें, अहंकारी घमेंडनंदनांना, जुलमी जालिमांना धोक्याची सूचना देणारें, असें हें कुराण. त्याहून थोर चमत्कार कोणता?"
<noinclude>{{right|इस्लामी संस्कृति | ७१}}</noinclude>
l9w01xm54hd8ab7lpa58cg423g5j5cg
अनुक्रमणिका:कृष्णाकुमारी-काव्य.pdf
106
104232
210244
2024-11-11T12:06:25Z
Pooja Ramesh Kadam
4303
नवीन पान
210244
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=कृष्णाकुमारी-काव्य
|Language=mr
|Volume=
|Author=सदाशिव प्रभाकर ताटके
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=
|Address=
|Year=1901
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

b48ts1nn2hb9kgc8y3y4xmojgmiyl6q
अनुक्रमणिका:मराठी दफ्तर रुमाल २.pdf
106
104233
210245
2024-11-11T12:11:22Z
Prajwalps123
4304
नवीन पान
210245
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=मराठी दफ्तर रुमाल २ लेखांक १ ते ४
|Language=mr
|Volume=
|Author=
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=वि. ल. भावे
|Address=ठाणे
|Year=1922
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

njup57py6ckjveg3js9ajjiansuv5g2
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८६
104
104234
210247
2024-11-11T15:40:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
210247
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}परंतु मुहंमद कांहींहि सांगोत, कुरेशांचे शेपूट वांकडेच असे. मुहंमदांचं सारें सांगणें पालथ्या घड्यावरचं पाणी होई. ते परमेश्वराच्या खुणा पहात ना, ईश्वरी संदेश ऐकत ना. डोळे असून आंधळे व कान असून बहिरे ते झाले. पूर्वीच्या दुष्ट रूढी, वाईट रीतिरिवाज सोडायला ते तयार होत ना. ते मुहमदांचे कट्टे शत्रु बनले. ते म्हणाले, "एक तूं तरी मरशील, मातीत मिळशील. नाहीं तर आम्ही तरी मरूं, जमीनदोस्त होऊ. परंतु तुझा पिच्छा पुरविल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. तुझा अधार्मिक प्रचार बंद करायला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. ध्यानांत धर."
{{gap}}असे दिवस जात होते. मक्केतील जीवन फार अशांत व भयाण झालें होतें. त्यांच्या अनुयायांचे जे छळ होत होते ते नाहीं कमी करतां येणार? नाहीं का हे विरोध मिटवतां येणार? एकेश्वरी धर्माचा परंपरागत धर्माशी समन्वय नाहीं का करतां येणार? मक्केतील ही भांडणें कमी होऊन गुण्यागोविंदानें नाहीं का राहतां येणार? असे का विचार पैगंबरांच्या मनांत या वेळेस खेळत होते? एके दिवशीं काबाजवळ तन्मय होऊन कुराणांतील त्रेपन्नाव्या सूरे नज़ममधील भाग मुहंमद म्हणत होते. "अल-लात, अलउजा, मनात् यांच्याविषयीं काय?" जवळच एक मूर्तिपूजक होता. तो मोठ्याने म्हणाला, "त्या परमेश्वराच्या कन्या. त्याहि ईश्वराजवळ भक्तांसाठी रदबदली करतील." जुन्या धर्मातील या तीन चंद्रदेवता. काबाच्या मंदिरांत यांच्या मूर्ति होत्या. अल्ला त-आला म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या त्या मुली असें मानीत. "या देवतांचं काय?" असें मुहंमद म्हणत आहेत तोच तो मूर्तिपूजक म्हणाला, "त्याहि देवकन्या. त्या खऱ्या आहेत." इतर लोकांस, आसपास जे होते त्यांना, वाटले की कुराणांतीलच हे शब्द आहेत. या देवतांना कुराण मान्यता देत आहे. कुरेश आनंदले. कोणी म्हणतात की मुहंमदांचा हा तडजोडीचा प्रयत्न असावा. त्या विचारांच्या तीव्रतेत असतांना "त्याहि देवता आहेत." असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. "त्या देवतांना मान द्या. ईश्वराजवळ तुमच्यासाठी क्षमेची रदबदली त्या करतील. म्हणून त्या परमेश्वरासमोर नमा, लवा. त्याची सेवा करा." आणि जमलेले तमाम सारे लोक लवले, प्रणाम करते झाले. सर्वांना बरें वाटलें. तडजोड जणुं झाली. मक्केचा द्वितीय धर्म झाला. परंतु मुहंमदांच्या चित्ताला चूकचूक लागली. नाहीं, या परमेश्वराच्या कन्या नाहींत. तो परमेश्वर कोणाचा<noinclude>
७२ ।</noinclude>
hgkyteoe1ajyzqubue336y9yq1b5hi0
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८७
104
104235
210248
2024-11-11T15:47:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
210248
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मुलगा नाहीं, त्यालाहि मुलेंमुली नाहींत. असत्यावर मुहंमद कसे स्थिर होणार? सत्य असत्याशी तडजोड कशी करील? जें नाहींच तें आहे असें कसें म्हणावें? मुहंमदांनी पुन्हां या पूर्वविधानाचा निषेध केला व म्हणाले, "या देवता नाहींत. हीं तीन पोकळ नांवें आहेत. तुम्ही व तुमच्या पूर्वजांनीं तीं शोधून काढली."
{{gap}}मुहंमदांच्या मनांत तडजोड करावी असें प्रथम असेलहि कदाचित्, परंतु असा विचार मनांत आला म्हणून का मुहंमद हिणकस ठरतात? ख्रिश्चन चरित्रकार मुहंमदांचा अधःपात, घसरले मुहंमद, घाबरले वगैरे... या गोष्टीसंबंधीं लिहितात. मुहंमद क्षणभर परम सत्यापासून जरा खाली आले तरी ते कां खाली आले? त्यांच्या अनुयायांचे अपार हाल होत होते. मूर्तिपूजेविरुद्ध मुहंमद झगडत होते. यश येत नव्हते. छळ पाहून त्यांचे दयार्द्र मन दुःखी होई. आणि म्हणून करावी थोडी तडजोड, असें आलेंहि असेल त्यांच्या मनांत. परंतु साऱ्या जीवनांत ही पहिली व अखेरीचीच तडजोड! याप्रसंगांनें मुहंमद हिणकस न दिसतां अधिकच उदात्त दिसतात. अनुयायांच्या छळानें क्षणभर कसे खालीं येतात, परंतु पुन्हां धैर्याने उभे राहून, "नाहीं, त्या देवता नाहींत. मला मोह पडला, सैतानानें मला क्षणभर भूल पाडली." असें ते जाहीर करते झाले. सत्यासत्याचा हा केवढा झगडा ! क्षणभर डोकावलेलें असत्य त्यांनी साफ उडवून दिलें. पुन्हां स्वतःला व स्वतःच्या अनुयायांना आगीत घालण्यासाठीं ते उभे राहिले. किती झालें तरी मुहंमद मर्त्य मनुष्यच होते. ते कांहीं ईश्वर नव्हते. ते स्वतःला साधा मर्त्य मानवच म्हणत. मुहंमदांचं जीवन मानवी आहे. आणि त्या छळामुळे क्षणभर झालेली जी ही चलबिचल तिच्याविषयीं पुढें ते कितीदा तरी बोलत. आपल्या प्रवचनांतून सांगत.

'''{{right|回{{gap}}回{{gap}}回}}'''<noinclude>{{right|इस्लामी संस्कृति । ७३}}</noinclude>
8pzemvrfhlm83714k8oq4tzwmv6vpj0
सदस्य चर्चा:Dyndev thorat
3
104236
210250
2024-11-12T05:02:15Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
210250
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Dyndev thorat}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १०:३२, १२ नोव्हेंबर २०२४ (IST)
o8jj1jt5wxels7dvvxtsrm3rgcz4gfl